कुडाळ : हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना जिद्द चिकाटी आत्मविश्वास बरोबरच श्रम फार महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत नवनवीन स्पर्धा नवनवीन शिकता यावे यासाठी चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज गेली चार वर्ष पूर्णब्रह्म बॅनरखाली राबवत असणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन नमो वॉटरफ्रंट गोवा हॉटेलचे मुख्य शेफ भूषण दुगाडे यांनी आज पूर्णब्रह्मच्या उद्घाटन प्रसंगी केले.
चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही पूर्णब्रह्म पर्व चौथे चे आयोजन दि. ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत केले आहे. आजपासून सुरु झालेल्या या महोत्सवात आंतरराज्य विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रा बरोबरच गोवा व कर्नाटक येथील १५ महाविद्यालयांचा सहभाग आहे पूर्णब्रह्म पर्व चौथेचे उद्धाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी सेंटरचे हेड ऑफ डिपार्टमेंट विवेकानंद शेट्टी कॉलेजचे मुख्य डॉ.शेफ अमोल राऊळ, मुख्य शेफ व परीक्षक ए एफ अफसर भूषण दुगाडे मुंबई कॉलेज चे समन्वयक नोएल फर्नांडिस, रोशन मोहंती ,क्युरी फर्नांडिस,भावेश म्हापणकर, मारिया डिसोझा, दत्तप्रसाद पवार, शेफ शशांक आमरे, प्रसन्न लाड विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री दुगाडे म्हणाले हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना त्या क्षेत्राची आवड ही महत्त्वाची आहे आणि या क्षेत्रात उतरताना उस्फुर्तपणे उतरणे गरजेचे आहे. पाटकर वर्दे कॉलेजच्या माध्यमातून गेली चार वर्षे हा उपक्रम राबवला जातोय हे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने चांगले आहे. काहीतरी वेगळे करून दाखवण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते. इच्छा प्रबळ असली तर आपण काहीही करू शकतो अशा पूर्णब्रह्म महोत्सवात महाराष्ट्र गोवा सह 15 कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले हे निश्चितच हॉटेल व्यवसायाला चांगली दिशा देणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल आराकिल्लाचे मुख्य सेफ ए एफ अफसर यांनी सांगितले की आजचे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धांमध्ये वाटचाल करण्यासाठी येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर ती आपली आवड प्रेसेंड करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः पुणे मुंबई सारख्या शहरात हॉटेल व्यवसायाची निगडित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून दिला जातो असे असताना या ठिकाणी कोकणात चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज हा उपक्रम गेली चार वर्षे विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध स्पर्धांना प्रारंभ
आज 3 डिसेंबर रोजी कप केक कॅनव्हास,शेक इट टू मेक इट, खाद्यरांगोळी, शोर साईड शेफ , मेनू डिझायनिंग , टॉवेल आर्ट चॅम्प, फेस पेंटिंग , फोटोग्राफी, या स्पर्धा झाल्या उद्या दि. ४डिसेंबर रोजी फ्लावर सेटिंग ,नॅपकिन फोल्ड, केक बॉस, क्विझ , सर्व्हिस स्प्रिंट, फ्लेमलेस कुकिंग ,रील मेकिंग या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच ११/१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि .५ डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ ,फ्लेमलेस कुकिंग , स्पोर्ट रिले,रील मेकिंग , एकपात्री अभिनय, प्लेट पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे .विविध बक्षीसांसह उत्कृष्ट काॅलेज, लक्षवेधी काॅलेज चा ही गौरव करण्यात येणार आहे.