सातार्ड्यातील श्री देव रवळनाथ पंचायतनाची दिवजाची जत्रा थाटात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2024 20:02 PM
views 186  views

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतनाची दिवजाची जत्रा थाटात पार पडली. त्यानिमित्ताने सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रीदेव रवळनाथाची मूर्ती विविध फुलांनी सजवण्यात आली होती.

 दरवर्षी दर पंधरा दिवसांनी एक असे दोन जत्रोत्सव पंचायतनाचे होतात. यामध्ये त्रिपुरारीचा जत्रोत्सव पार पडल्यानंतर अमावस्येचा आजचा जत्रोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर रात्री दशावतार नाट्य मंडळाच्या कार्यक्रमानंतर पहाटे दहिकाल्याने जत्रोत्सवाची सांगता झाली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने दर्शनासाठी देव देवतांची तरंगकाठी मंदिरामध्ये ठेवून जत्रोत्सव साजरा होतो.