
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटने मार्फत काथा उद्योगाचे 50 फॉर्म भरण्यात आले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करावे म्हणून संघटनेमार्फत काथ्या पासून वस्तू बनविणे या प्रशिक्षणाचे 50 फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी संघटनेचे आभार मानले.
महिलांसाठी अजून काही उपक्रम असल्यास आम्हाला कळवावे असे महिलांनी सांगितले. तुमच्या संघटनेचे काम खूप कौतुकास्पद आहे. हे ट्रेनिंग दोन महिन्याचे आहे. यामध्ये गव्हर्मेंट सबसिडी आहे.तर कालावधी हा दोन महिन्याचा असून शनिवारी यांचा शुभारंभ फॉर्म भरून व माहिती देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमला प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका भारती मोरे यांनी महिलांचे कौतुक केले. यावेळी तालुकाध्यक्ष कुडाळ अनघा आनंद रांगणेकर यांनी व्यवसाय कसा करावा याची माहिती दिली व उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
यावेळी शर्वरी धारगळकर माजी नगराध्यक्ष, सायली होडावडेकर उपशहरप्रमुख, ज्योत्स्ना सूतार, शाखाप्रमुख जिल्हाध्यक्ष. संतोष तळवणेकर. उपाध्यक्ष मंगेश माणगावकर. खजिनदार ज्ञानेश्वर पारधी. जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे. तालुकाध्यक्ष संचिता गावडे. जिल्हा सदस्य पूजा सोनसूरकर सावंतवाडी शहराध्यक्ष सेजल पेडणेकर. अंकिता सावंत. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यक्रम उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी सूत्रसंचालन केले.