
सावंतवाडी : महात्मा फुले योजनेखाली मोफत वैद्यकीय उपचारासाठी माझच हॉस्पिटल झालं पाहिजे असा अट्टाहास नाही. मात्र, मतदारसंघातील दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू करण्यात यावी. पहिल अभिनंदन करणारा मीच असेन. सावंतवाडी मतदारसंघात केवळ सिंगल स्पेशालिटी व सरकारी रुग्णालयात ही योजना आहे. सीमेवरील तालुक्यांना दोन ठिकाणी योजना लागू करण्याचा जीआर आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील परिपूर्ण असणाऱ्या रूग्णालयात ती योजना लागू करण्यात यावी. ऑडिट झालेल असताना माझ्या मल्टीस्पेशालिटीला योजना लागू होण अपेक्षित होत. परंतु, पुढे काही झालं नाही. अजून वेगळं काही असेल तर त्यात मी पडू इच्छित नाही असं मत सावंतवाडी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत विचारले असता ते बोलत होते. यावेळी अँड. नकुल पार्सेकर उपस्थित होते.
डॉ. नवांगुळ म्हणाले, कोण आड येत असं मी म्हणणार नाही. पण, महात्मा फुले योजना माझ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला लागू व्हावी यासाठी मी प्रयत्नशील होतो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मल्टीस्पेशालिटीला कुठेही ही योजना लागू नाही. ती केवळ सिंगल स्पेशालिटीला आहे. कणकवलीत ही योजना लागू असणारी हॉस्पिटल असल्याने आपल्याकडेही तशी सुविधा असावी या भावनेतून मी प्रयत्नशील होतो. यासाठी योग्य तो पाठपुरावा देखील केला. बॉर्डरच्या तालुक्यांना दोन हॉस्पिटल ही या योजनेखाली असावी असा जीआर देखील झाला आहे. त्यामुळे सावंतवाडीत ही योजना लागू होईल या अपेक्षेत होतो. त्यात पुन्हा एकदा ही प्रक्रिया करण्यासाठी सांगण्यात आले. ऑडीट देखील निघाल, ही योजना मिळण्याची ती पहिली पायरी आहे. माझ्या हॉस्पिटलला उत्कृष्ट शेरा देखील मिळाला. परंतु, तदनंतर काही झालं नाही. त्यामुळे यापुढे अजून कोणती वेगळी पायरी आहे का ? अस वाटल. त्यात मी पडू इच्छित नाही. या मतदारसंघातील लोकांना मोफत उपचार उपलब्ध व्हावेत याच हेतूनं मी कार्यरत होतो. मी कोणालाही दोष देणार नाही. सर्वच राजकीय लोकांनी सहकार्याची भुमिका घेतली असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, माझं हॉस्पिटल झालं पाहिजे असा अट्टाहास नाही. मात्र, मतदारसंघातील दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ही महात्मा फुले आरोग्य योजना लागू करण्यात यावी. पहिल अभिनंदन करणारा मीच असेन अशी भूमिका डॉ. नवांगुळ यांनी जाहीर केली. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मी मदत म्हणून जात असतो. सरकारी रुग्णालयाला सावंतवाडी डॉक्टर असोसिएशनचे सहकार्य असते. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा दीपक केसरकर यांचा स्तुत्य उपक्रम आहे. सुपर स्पेशालिटीची संकल्पना त्यांच्या मनात आहे. ते झाल पाहिजे, नारायण राणे यांनी देखील अशाच पद्धतीच हॉस्पिटल जिल्ह्यात उभ केल आहे. त्या ठिकाणी देखील महात्मा फुले योजना लागू आहे. कणकवलीतील चार, कुडाळ येथील दोन हॉस्पिटल या योजनेखाली आहेत. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील देखील हॉस्पिटल या योजनेखाली असावीत. खाजगी आणि सरकारी शस्त्रक्रिया या योजनेत वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. त्यामुळे नियमानुसारच सगळ्या गोष्टी होतील. उपजिल्हा रुग्णालयात देखील ही योजना कार्यान्वित आहे. सावंतवाडी मतदारसंघासाठी ६ हॉस्पिटल या योजनेखाली मंजूर आहेत. मात्र, केवळ दोनच कार्यान्वित आहे. शिरोडा येथील नॉन परफॉर्मींगमुळे या योजनेची मान्यता काढून घेण्यात आली. ती खरं तर दुसरीकडे देणं आवश्यक होतं. या मतदारसंघातील ३० बेड असणाऱ्या खासगी रुग्णालयात ही योजना लागू करण्यात यावी असं मत व्यक्त केले.