
वैभववाडी : निवृत्त शिक्षक शरद नारकर यांचा त्यांच्या मुळ गावी भुईबावडा येथे सत्कार करण्यात आला.येथील माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री.नारकर गुरुजी हे ३०सप्टेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मुळ गावी त्यांचा सत्कार करण्यात आला.गावातील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी बोलताना श्री.नारकर म्हणाले, माझ्या आयुष्यात मी जे काही यश कमावले आहे त्यात माझ्या गावाचा मोठा वाटा आहे. गावातील ग्रामस्थांनी केलेले सहकार्य मी केव्हाच विसरणार नाही. मी शिक्षणक्षेत्रात सरकारी सेवेतून जरी निवृत्त झालो असलो तरी गावांच्या शिक्षण क्षेत्रासाठी सदैव काम करणार आहे. गावच्या माध्यमिक विद्यालयात सभागृह बनविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं आश्वासन दिले.
यावेळी सरपंच बाजीराव मोरे, मुख्याध्यापीका ए.बि.रावराणे, रमाकांत मोरे,दाजी प्रभू,पिंट्या कडू,दशरथ प्रभू, देवानंद कडू यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.