
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा स्पर्धेत वेंगुर्ले वडखोल येथील सुप्रिया केरकर पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर उपविजेत्या शहरातील राऊळवाडा येथील मेघना राऊळ यांचा नथ देऊन व तृतीय क्रमांक प्राप्त अक्षरा गोखरणकर यांचा टेबल फॅन देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत ४५ महिलांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगरसेविका सुमन निकम, साक्षी चमणकर, कोमल सरमळकर, राजश्री मरये, सुरेश भोसले, विवेक आरोलकर, सुजित चमणकर, पंकज शिरसाट, हेमंत मलबारी, सचिन मांजरेकर, सुहास मेस्त्री, डेलीन डिसोजा आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.