कोकणसाद LIVE च्या वराडमध्ये झालेल्या 'खेळ पैठणी'ला तुफान प्रतिसाद

Edited by: ब्युरो
Published on: October 08, 2024 15:52 PM
views 231  views

मालवण : कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आयोजित मालवण - वराडमध्ये झालेल्या 'खेळ पैठणी'ला तुफान प्रतिसाद मिळाला. सांची परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी खानोलकर यांनी दुसरा क्रमांक तर तिसरा क्रमांक सारिका वराडकर यांनी मिळवला. 

धमाकेदार खेळ, उखाणे, गाणी यांमुळे चांगलीच रंगत आली. महिलांनी धमाल करत खेळाचा आनंद लुटला. प्रथम क्रमांक विजेत्या सांची परब यांना बेलवलकर ज्वेलर्स पुरस्कृत सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आलं. दुसरा क्रमांक विजेत्या साक्षी खानोलकर  यांना अरविंद साडी सेंटर पुरस्कृत पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं. तिसरा क्रमांक मिळविलेल्या सारिका वराडकर यांना कृपा हेअर टॉनिक आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलंय. यावेळी कोकणसाद LIVE च्या संपादक देवयानी वरसकर, मार्केटिंग हेड समीर सावंत, ग्रामस्थ, कोकणसाद LIVE ची टीम उपस्थित होती. 

 रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या खेळ पैठणीला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.