
सिंधुदुर्ग : कोकणातील उच्च विद्याविभुषित व्यक्तिमत्व व केंद्र शासनाचे अधिकारी ज्यांकडे B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, M.A (TRANSLATION STUDIES), PGDHRM, PGDLL & IR, PGDT अशा प्रकारे विविध शैक्षणिक अर्हता संपादित केल्या आहेत. डोंबिवली चे रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचे भूमिपूत्र व मुंबई कस्टम्स म्हणजेच मुंबई सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी (SSC JHT 2017 EXAM, AIR 166) पदावर कार्यरत असणारे व जवळपास 10 वर्षांहून ही अधिक काळ सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे सत्यवान यशवंत रेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कुणबी युवा मंच मुंबई व जवाहर नवोदय विद्यालय, निजामपुर यांच्यामार्फत आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे नाबाद त्रिशतक साजरे केले.
त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जवळपास 22 यशोगाथा निर्माण होऊन शासकीय विभागात रूजू आहेत. कोकणातील व महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी सत्यवान रेडकर आपल्या कुटुंबाला कमी प्राधान्य देऊन कोकण व महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासनात विविध गट अ ते गट ड पदांवर कशा प्रकारे येतील यासाठी अविरतपणे मार्गदर्शन करीत आहेत, नोकरी संदर्भातील अपडेटस व माहितीचे प्रसारण करीत आहेत. रेडकर सर व्याख्यानासाठी कोणताही मोबदला घेत नाहीत, साधी जीवनशैली परंतु उच्च व प्रगत विचार, दुरदृष्टिकोण, प्रभाशावली वक्तृत्व, केंद्र शासनात कार्यरत परंतु गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शासकीय सेवेत यावेत, उच्चशिक्षित व्हावेत यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणारे धाटणीचे अधिकारी यांमुळे त्यांनी कोकणातील व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या ह्रदयात आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची ही शैक्षणिक चळवळ तिमिरातुनी तेजाकडे या नावाने प्रसिद्ध असून ही नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. माणगाव तालुक्यातील या व्याख्यानासाठी कुणबी युवा मंच मुंबई चे ज्ञानेश्वर खराडे (अध्यक्ष), सत्यजीत भोनकर (सचिव) व अन्य सर्व पदाधिकारी व निजामपुर विभागातील सामाजिक कार्यकर्ते नितीन बडे, जवाहर नवोदय विद्यालयाचे उप प्राचार्य, श्री. राऊत सर, गोरेगाव येथील कलाशिक्षक, चंदन तोडणकर यांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले.