चिपळुणात ताजा बाजार होणार सुरू

व्यापारी सुधीर शिंदे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
Edited by: मनोज पवार
Published on: October 08, 2024 11:20 AM
views 366  views

चिपळूण  :  शहरातील नामवंत भाजीचे व्यापारी सुधीर शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी बायपास रोडला ताजा बाजार भाजी मंडई सुरू भाजीचे एक नवे दालन ग्राहकांसाठी  निर्माण केले. येथे भाजी खरेदीसाठी खूप झुंबड उडत असे. मात्र आता काही कारणास्तव तिथला ताजा बाजार भाजी मंडई बंद करून त्यांनी  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती दिनांक १२ रोजी पुन्हा शहरात जुन्या भाजी मंडईच्या  बाहेर नातू हॉस्पिटल समोर   स्वतंत्र  जागेत ताजा बाजार भाजी मंडई सुरू करत आहेत.   या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होलसेल भाजीची विक्री होणार आहे,  अशी माहिती त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.


गेले अनेक वर्ष उद्योजक म्हणून प्रसिद्ध असणारे आणि चिपळूण नगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे भाजीचे व्यापारी सुधीर शिंदे यांनी काही कारणास्तव स्वतंत्र ताजा बाजारच्या नावाने बायपास रोड वरती एक सुंदर भाजी मंडईचे दालन उघडले होते.  या ताजा बाजार भाजी मंडईला सुद्धा शहर आणि तालुक्यातल्या ग्रामीण भागातील ग्राहकाने उत्तम प्रतिसाद दिला.  होलसेल भाजी विक्री आणि माफक दरामध्ये भाजी मिळत असल्याने या ठिकाणी भाजी घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत असे.  मात्र,  मधल्या काही काळात तेथील काही तांत्रिक कारणांमुळे तिथला त्याचा ताजा बाजार भाजी मंडई दुसरीकडे घालवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि याच निर्णयानुसार सुधीर शिंदे यांनी ताजा बाजार भाजी मंडई नावाने  जुना स्टॅन्डच्या बाहेर आणि नातू हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या स्वतंत्र जागेत ते पुन्हा ताजा बाजार भाजी मंडई सुरू करीत आहेत.  दि.  12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी असून या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती ताजा बाजार भाजी मंडई सुरू करणार असल्याचे त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले.  ताजा बाजार येथे त्यांचे 14 काउंटर होते.  मात्र या ठिकाणी चार काउंटर असणार आहेत.  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होलसेल भाजीची विक्री केली जाणार आहे. सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत भाजीचा लिलाव होईल त्यानंतर सात ते पुढे 11 किंवा 12 वाजेपर्यंत होलसेल भाजीची विक्री केली जाणार आहे.   किरकोळ भाजीसाठी फक्त एकच काउंटर ठेवणार असलेले त्यांनी बोलताना सांगितले.  


भाजी व्यवसाय मध्ये त्यांचं आधीपासूनच नावलौकिक असल्यामुळे ग्राहक  आणि त्यांचे  ऋणानुबंध  गेल्या काही वर्षात जुळले आहेत.  नव्याने सुरू होणाऱ्या ताजा बाजार मध्ये सुद्धा ग्राहक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.  हॉटेल्स, कॅटर्स वाले,  लग्न समारंभ, सार्वजनिक पूजा, मोठे कार्यक्रम आणि   किरकोळ भाजी विक्रेते   या सर्वांसाठी माफक दरामध्ये होलसेलमध्ये भाजी विक्री केली जाणार असे त्यांनी बोलताना सांगितले. 

   नवा विचार आणि नवी दिशा घेऊन या भाजी मंडईची सुरुवात होणार आहे.  त्यामुळे तुम्हा सर्वांचे सहकार्य कायम मिळू दे असा यांनी आशावाद व्यक्त केला.