
कणकवली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपविणार अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज 5 ऑक्टोबर रोजी महायुती व आरपीआय आणि आरक्षित समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने जनता या मोर्चात सहभागी झाली.
तर काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा जाणवली पुलावरून रवाना झाला. त्या नंतर बुद्ध विहार येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केले अभिवादन करण्यात आले. भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली रवाना झाली.
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचा, या राहुल गांधीचे करायचे काय खाली डोके वर पाय..., भारतीय संविधानाचा जयजयकार करत ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोचली. त्या ठिकाणी शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन करू रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले.