
सावंतवाडी : अमोल कोल्हे यांनी सावंतवाडीकरांना संबोधित केले. सावंतवाडी आल्यावर या मातीवर नतमस्तक व्हाल लागत, कारण जेव्हा जेव्हा दिल्लीला संसदेत जातो तेव्हा बॅ नाथ पै, मधू दंडवते यांची आठवण निघते. अशी महान लोक हा मातीने दिली. महाराष्ट्रात फिरत असतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन छत्रपतींनी बांधलेला किल्ला बघा असे ताठ मानेने सांगायचो, पण जी काय त्याठिकाणी घटना घडली. त्यामुळे मान खाली गेली. ज्या छत्रपतींच्या नावाने आमचा ऊर भरून येतो त्यांचा पुतळा उभा करण्यामध्ये असा अक्षम्य भ्रष्टाचार केला गेला. पुतळा कोसळला ही केवळ चूक नाही तर हा अपराध आहे. जे पाप आहे याला माफी नाही. ज्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला अशा १ फुल २ हाफचे वस्त्रहरण केल्याशिवाय शांत राहू नका. एक झग्यावाला जादूगार तर इकडे जॅकेटवाला जादूगार असे म्हणत अमोल कोल्हेंनी उडवली दीपक केसरकर यांची खिल्ली उडविली.