
सावंतवाडी : गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शरद पवार कधी राहिले नाहीत. दीपक केसरकर १५ वर्ष आमदार, ७ वर्ष मंत्री राहिले आहेत. यांना आम्ही आमच्याकडे असताना कडेवर घेतले तिथे चूक झाली. आता शिंदे यांच्यासोबत राहतील की नाही यात शंका आहे. माझं केसरकर यांच्या सोबत वैर नाही. मात्र त्यांना संधी मिळाली पण ते कुचकामी राहिले. कोणताही कार्य करू शकले नाही. म्ह्णून यावेळेला कर्तबगार व्यक्ती शरद पवार यांनी दिली आहे. अर्चना घारे आमची सुसंस्कृत कन्या आहे. आता बदल करूया. भाकरी करपली आहे ती बदलण्याची वेळ आली आहे. आता शिवसेना व विनायक राऊत आम्हाला साथ देतील. काँग्रेस पक्ष आमच्यासोबत राहिला यांचा ठाम विश्वास आहे. आता चुकीचा माणूस नको. बदल झाला पाहिजे. जयंत पाटील यांना विनंती करतो की, अर्चना परब यांना संधी द्या. उद्धव ठाकरेंचा आदेश मिळाला की, शिवसेना पदाधिकारी सरळ होऊन आम्हाला मदत करणार. यामुळे अर्चना घारे यांना संधी देऊन या भागाचा विकास करूया अर्चना घारे यांना या विधानसभेवर पाठवूया असे आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केले.