
सावंतवाडी : इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे. गो रक्षक व पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित टेम्पो रोखला. बांदा तपासणी नाका येथे पुढील कारवाई सुरू असून महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता म्हणून नुकतेच जाहीर केलेलं असताना कत्तलीसाठी होणारी गो तस्करी मात्र सुरूच आहे.
देवगड येथील गाई गुरे कत्तलीसाठी दोडामार्ग मार्गे कर्नाटक घेऊन जाण्याचा प्रयत्न गो तस्करांकडून करण्यात आला. मात्र, गो रक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीसांच्या मदतीने गो तस्करी करणारी गाडी इन्सुली खामदेव नाका येथे अडविण्यात आली. संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येत आहे. एकीकडे, महाराष्ट्र सरकारनं देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर प्रथमच गो तस्करीची घटना समोर आली आहे. त्यामुळे गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळून देखील त्या सुरक्षित नसल्याचे दिसून येते आहे.