
वेंगुर्ले : किराणा दुकानांत तसेच हॉटलमध्ये काम करणारा आसोली-कुंकेरखिंड येथे रहाणारा सागर सुरेश परब (२२) हा दि ४ सप्टेंबर रोजी शिरोडा येथे कामास जातो असे घरी काकांना सांगून गेला तो परतच आलेला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो न आढळल्याने त्याचे काका रमेश परब यांनी आपला पुतण्या नापत्ता झाल्याची तक्रारी वेंगुर्ले पोलीसांत दिली आहे. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये नापत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
आसोली-कुंकेरखिंड येथे रहाणारा सागर सुरेश परब हा शिरोडा भागातील किराणा दुकान, हॉटेल व या स्वरूपांतील दुकांनात कामे करत होता. दररोज कामावरून तो घरीही येत होता दि ४ सप्टेंबर रोजी त्याने सकाळी ८ वाजण्याच्या सुमारांस आपण शिरोड्यात कामास जात असल्याचे सांगून कपड्याच्या पिशवीसह तो गेला. अन काका हे मुंबईतील हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या बहिणीस पहावयांस गेले होते. मात्र त्यांना गावी येण्यास उशीर झाला. अन त्यांनी पोलीसांत तो नापत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
कदाचित काका घरी नसल्याने सागर सुरेश परब हा युवक कोणाकडे कामास राहिला असेल आणि तेथेच रहावयास राहिला असेल वा कुठे आढळल्यास त्याचेबाबत रमेश परब-9420249001 यांचेकडे किंवा वेंगुर्ले पोलीसांत माहिती द्यावी असे आवाहन वेंगुर्ले पोलीसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रूपाली वेंगुर्लेकर या करीत आहेत.