मालवण पुरवठा निरीक्षक ईब्राहीम तडवी यांची बदली

मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने सन्मान
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 03, 2024 12:22 PM
views 259  views

मालवण : मालवण पुरवठा निरीक्षक ईब्राहीम तडवी यांची नुकतीच देवगड येथे बदली झाली. मालवण येथील सेवेत असताना त्यांनी अल्पकाळात रेशन दुकानदारांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले. सर्व दुकानदारांना आदरपूर्वक वागणूक दिली. त्यामुळे मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने ईब्राहीम तडवी यांचा सन्मान करण्यात आला.  


यावेळी मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटनेचे अध्यक्ष अमित गावडे, उपाध्यक्ष बाळकृष्ण लुडबे, सचिव सुभाष गिरकर, संघटनेचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष सुहास हडकर, सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे सल्लागार कमलाकांत कुबल, विलास पांजरी, गणेश सावंत, द्वारकानाथ पालव, विलास धुरी, विशाल ढोलम, अमित प्रभुदेसाई, दत्ता टक्के, दादा मांजरेकर, सचिन कांडरकर, पराग आचरेकर, बाळा केळुस्कर, योगेश जाधव, रोहित पेडणेकर, सत्यविजय ढोलम, सुनील पालव, नंदकुमार सावंत, बबन परब, हनुमंत दळवी, दादा कुशे, श्रेया चव्हाण, तुषार मालवणकर, खुशी मलये यांच्यासह असंख्य दुकानदार उपस्थित होते.