विविध स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे यश

Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2024 11:43 AM
views 85  views

वेंगुर्ला:  ‘स्वच्छता ही सेवा‘ या अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उज्ज्वल यश मिळविले.

यात प्रश्नमंजूषामध्ये श्रेया मराठे व सिद्धी गावडे, कच-यातूल कल्पकता स्पर्धेत आराध्या मुणनकर, सीया गावडे व श्रेयांश सावंत, चित्रकला स्पर्धेत सीया गावडे यांचा समावेश आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोझा तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.