
दोडामार्ग : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्यं मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर ते दि.०२ ऑक्टोंबर या कालवधीत स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता हि सेवा’ (SHS) पंधरवडा देशभरात राबविण्यात येत आहे. सदर पंधरवड्यात कसई-दोडामार्ग नगरपंचायतमार्फत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
‘स्वच्छता हि सेवा’(SHS) अभियानाचा समारोप ०२ ऑक्टोबरला ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती’ व ‘स्वच्छ भारत दिवस’ या कार्यक्रमाने करण्यात आला. महात्मा गांधीजीना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोंबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. त्यानुसार सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य मार्गावरून ‘स्वच्छता रﬞली’ व ‘स्वच्छता मोहिम’ राबविण्यात आली.
स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर उपक्रमात सहभागी झालेले लक्ष्मी सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग, आम. दीपक केसरकर विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग यामधील विद्यार्थी उपस्थित होते.