शिवसेना महिला आघाडीचा ४ ऑक्टोबरला नवरात्रोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: October 02, 2024 14:46 PM
views 202  views

सावंतवाडी : शिवसेना शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ४ ऑक्टोबरला वैश्यभवन सभागृहात नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात महिला व मुलींसाठी गरबा, दांडिया, वेशभूषा तसेच लकी ड्रॉ, फनी गेम अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

तसेच या स्पर्धेसाठी आकर्षित बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन येथील शहर प्रमुख भारती मोरे यांनी केले.