सफाईदुत समीर मोहिते यांचा वाढदिवस साजरा

Edited by: मनोज पवार
Published on: October 02, 2024 10:56 AM
views 42  views

चिपळूूण ; महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आणि स्वच्छता ही सेवा अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा "स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता" मोहीम अंतर्गत चिपळूण नगर परिषद मालकीच्या, शिवाजी नगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी, स्वच्छता भारत दिन साजरा करण्यात आला.  या दिवसाचे निमित्ताने चिपळूण नगर परिषद आरोग्य विभाग मधील सफाईदुत समीर मोहिते यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला

कार्यक्रम स्थळी सजावट करणेत आलेले मंडप हे टाकाऊ वस्तुपासून तयार करणेत आले होते. हा उपक्रम  चिपळूण नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.  कार्यक्रमाची सर्व तयारी चिपळूण नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील सफाई दूतांनी केली. 

या  उपक्रमात चिपळूण नगरपरिषद उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकार, लेखापाल अवधूत बेंद्रे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, सभा अधीक्षक  संतोष शिंदे, अभिलेख व भांडार विभाग प्रमुख वलिद वांगडे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव व सुजित जाधव, प्रकल्प सुपरवाईजर सागर सावंत तसेच सर्व कार्यालय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.