सुनील पांगम यांना मातृशोक

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:32 PM
views 387  views

कणकवली : नाटळ येथील रहिवासी मंगला राजाराम पांगम (८६) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

कणकवली येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुनील पांगम, गिरण व्यावसायिक रविकांत पांगम व नाटळ येथील संकेत गॅरेजचे मालक संतोष पांगम यांच्या त्या मातोश्री होत. तर सेवानिवृत्त आरोग्य सेविका स्नेहल पांगम व सोनाली पांगम यांच्या त्या सासू होत.