दोडामार्गात खुली भजन स्पर्धा

Edited by: लवू परब
Published on: September 26, 2024 12:29 PM
views 155  views

दोडामार्ग :  नवरात्रौत्सव निमित्त विघ्नहर्ता कला व सांस्कृतिक मंडळ, पूर्वसन साळ येथे भव्य खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन दिनांक ०६ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे, ही स्पर्धा संध्याकाळी ४ वाजता सुरु होणार आहे.

   या स्पर्धेसाठी प्रथम १२ संघाना प्राध्यान्य देण्यात येणार आहे. तसेच संघात ८ ते १२ स्पर्धक असावेत. श्लोक, नमन, रूपक, ध्यान, अभंग, गजर, गौळण असे सादरीकरण असावे अभंग, गौळण यासाठी वेगवेगळे गायक असावेत. बैठ्या व हातपेटी वर भजन सादरीकरण करावे व त्याची वेळ ३० मिनिटे राहिलं. मराठी व हिंदी गाण्याच्या चालीवर सादरीकरण नसावे. आगोदर नावनोंदणी करणाऱ्या संघानाच प्रवेश दिला जाईल, सादरीकरणा पूर्वी ३० मिनिट संघाने उपस्थित राहणे बंधन कारक राहील.

 अधिक माहिरी साठी राजन नाईक 9404432984 व संचित गवस 9067587732 यांच्याशी संपर्क साधा