सावंतवाडीत 29 सप्टेंबरला शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा

दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: September 26, 2024 10:05 AM
views 252  views

सावंतवाडी : दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक २९/९/२०२४ ला दुपारी ३.०० वा. नवरंग सभागृह, आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी येथे हा आयोजित करण्यात आला आहे.

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिले जाणारे गुरुसेवा पुरस्कार व शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन गुणगौरव केला जातो. त्याचे वितरण. तसेच मंत्री दिपक केसरकर  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हयातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी घेतलेली ऑनलाईन समूहनृत्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण, रोख रक्कम व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत - शिष्यवृत्ती धारक तीन तालुक्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यातील यशस्वी मुलांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.

गुरुसेवा पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ, ग्रंथ देऊन गौरविले जाईल. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन राजन पोकळे, आबा केसरकर यांनी केले आहे.