
सावंतवाडी : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते पंढरपूर, लातूर, नेवासा या ठिकाणीआमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई या संस्थेच्या मार्फत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी तसेच तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाच्या उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईकडून पाठिंबा देण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास जंगले, लक्ष्मण पाटील, भरत गोरे, धोंडू कोकरे, तुकाराम पाटील, धोंडी लांबर,आनंद वरक, चंद्रकांत जंगले, दशरथ कोकरे, प्रकाश पाटील, सिद्धेश कोकरे, भैरु यमकर, प्रकाश बुटे, तुकाराम जंगले, दशरथ जंगले. लक्ष्मण बरागडे, भगवान जंगले, संजू गावडे, ठकू जंगले आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.