
सिंधुदुर्ग : बदलापूर येथील घडलेल्या या घटनेबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी अशा प्रकाराबाबत सर्व पोलीस ठाण्याला सूचना द्याव्यात अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या उप नेत्या जानवी सावंत सह महिला पदाधिकाऱ्यांनी सादर केले आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात बदलापूर येथील आदर्श या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या ४ वर्षाच्या दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे.
आपल्या राज्यात गत काही महिन्यात पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेतील एका विद्यार्थ्यांने स्वच्छता गृहात येऊन केलेला अत्याचार, अकोला जिल्ह्यातील काक्षीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा केलेला लैंगिक छळ, नवी मुंबईतील कोपरखैराणे व उरण येथे झालेल्या घटना पाहता पीलीस प्रशासन राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी किती सक्षम आहेत हे दिसून येते. तसेच अशा प्रकारच्या महिला अत्याचारावरील गंभीर गुन्ह्यांत स्थानिक पोलीस ठाण्यांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
राज्यात दर तासाला ५ घटना घडत आहेत. सन २०२३ मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या आकडेवारीचा विचार करता राज्यात बलात्काराच्या ७.५२१ घटना, अपहरणाच्या १६९८ घटना, हुंडाबीच्या १६९ घटना, नातलगांकडूनकुर पद्धतीने त्रासाच्या ११२२६७६ घटना, विनयभंग, लैंगिक अतगचाराच्या १७२८१ घटना घडल्या. तसेच मुंबईमध्ये मे २०२७ अखेर महिन्यात बाल डैमिक अत्याचाराच्या घटने संदर्भात ५०९ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सदरहू आकडेवारी चिंताजनक असून राज्यात कस्यदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची ख्याती संपूर्ण जगात आहे, परंतु या ख्धातीला साजेशी तत्परता, संवेदनशीलता या गंभीर घटनांच्या चौकशीत आणि कारवाईला दिसून येत नाही. पोलीसांकडून अशा घटनांकडे होणारे दुर्लक्ष अत्यंत खेदजनक आहे अरण त्यामुळे गुन्हेगाराला अभय मिळत असल्याचे दिसते.
अशा प्रकारच्या महिला अत्याचारांत गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्वरित तक्रारी दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनास द्यावेत, अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे आपणाकडे करीत आहे श्रीमतीविशाखा राऊत उपनेत्या , प्रियांका चतुर्वेदी उपनेत्या, खासदार-राजासभा , ऋतुजा लटके आमदार शिवसेना महिला आघाडी यांनो निवेदन दिले आहे सदरचेनिवेदन जिल्हाधि रीअनिल पाटील यांना सादर केले यावेळीउपनेत्या जान्हवी सावंत, रत्नागिरी संपर्क प्रमुख वर्षा पितळे, निरीक्षक माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर,निरीक्षक व माजी नगरसेविका अनिता बागवे. आदी उपस्थित होते