
वेंगुर्ला : ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी अशी दोन पद होती. ही दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी असे एकाच पद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार आजच्या संपन्न झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली. याबद्दल वेंगुर्ला तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी संघटनेचे तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर काळसेकर , सचिव विवेक वजराटकर, जिल्हा कार्यकारणी सहसचिव प्रवीण नेमण, पतसंस्था संचालक चेतन अंधारी, संघटना कोषाध्यक्ष आनंद परुळेकर, सदस्य प्रल्हाद इंगळे, गणेश बागायतकर, तुषार हळदणकर , स्वप्नील जाधव, दत्तात्रय पवार, मधुकर नवार आदी उपस्थित होते.