
वेंगुर्ला: शालेय शिक्षण मंत्री ३ टर्म आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदार संघातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सिंधुरत्न, चांदा ते बांदा अशा अनेक योजनांतुन प्रत्येक माणूस सुखी होण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरु आहे. गोरगरीब जनतेला आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात मदत ते करत आहेत. यासाठी संघटनेतील युवकांनी सामाजिक बांधिलकीतुन लोकांसाठी सातत्याने काम केले पाहिजे. ग्रामीण भागात लोकांच्या छोट्या छोट्या शासकीय, सामाजिक कामात सहकार्य केले पाहिजे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्याला दिलेले शिवसैनिक हे मोठे पद आहे सर्वोच्च मानून जनतेच्या सेवेसाठी काम करावे. या प्रवासात युवकांना सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिली.
वेंगुर्ला तालुका युवासेनेच्या वतीने सप्तसागर अपार्टमेंट येथील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या युवासवांद पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्यात सचिन वालावलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, शहर युवासेना सचिव सागर गावडे, सी एम वोर रूमचे नीरज पंचोली आदी उपस्थित होते.
युवकांनी संघटनेत सातत्याने संपर्कात राहील पाहिजे. जास्तीत जास्त वेळ संघटनेसाठी दिला पाहिजे. युवकांनी संघटनेला वेळ दिला तर संघटना अधिक मजबूत होणार आहे. वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व सचिन वालावलकर यांच्या प्रयत्नातून अनेक पर्यटन विषयक विकास काम येत आहेत. यातून आगामी काळात अनेक रोजगार निर्माण होतील. वेंगुर्ल्याचे बदलणारे दिवस हे तुमचे युवकांचे आहेत. दीपक केसरकर यांचे व्हिजन मोठे आहे. यामुळे युवकांनी पुढे येऊन केसरकर यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी पुढे यावे असे आवाहन नितीन मांजरेकर यांनी केले.
तर यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे म्हणाले की, एकीचे बळ फार मोठे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. दीपक केसरकर अनेक योजना जनतेसाठी आणत आहेत. यामुळे आगामी काळात पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून युवकांची संपूर्ण ताकद आपण पक्षाच्या मागे उभी करू असेही हर्षद डेरे म्हणाले तर आगामी काळात दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठाम राहू अशी ग्वाही स्वप्नील गावडे यांनी दिली.