
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेनंतर कोकणात भाजपला यश मिळावे यासाठी पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले जात आहे त्याच बरोबरच राज्यात विशेषतः कोकणात महिला संघठण मजबुतीसाठी जोर दिला आहे. यासाठीच राज्याच्या भाजपा महिला प्रभारी म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्या कडे केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे. त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे कोकण विभागातील महिला पदाधिकारी याचाशी सम्पर्क साधून आढावा बैठक घेऊन त्यांनी महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत . त्याच बरोबरच विविध भागातील डाटा महिला पदाधिकारी यांनी तयार करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.
याबाबत नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा, सर्व तालुका, शहर, ग्रामीण भागातील महिला पदाधिकारी याच्याशी संवाद साधला . यावेळी जिल्हा भरातून प्रमुख पदाधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
दोडामार्ग शहरात महिलांशी संवाद
केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून गावपातळीवर महिला साठी राबविलेल्या विविध प्रकारच्या योजना पोहचल्या आहे. त्याची पातळीवर गाव भेट घेऊन वाडी वस्तीवर लोकप्रतिनिधीचे सहकार्य योगदान लाभले. त्यातून वैयक्तिक लाभ मिळाला त्या लाभार्थी पर्यंत पोहचलो पाहिजे. त्यांना भाजपा पक्षाच्या माध्यमातून गावपातळीवर झालेली विकास कामे याची माहिती दिली पाहिजे. यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला सरपंच, नगरसेवक बचत गट, युवक मंडळ, संस्था पदाधिकारी भेट घेऊन चर्चा करवी या माध्यमातून गावपातळीवर महिला संघटना मजबूत करावी असे आवाहन राज्याच्या भाजपा महिला प्रभारी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी केले.
भविष्यात येणाऱ्या काळात महिला पदाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे यासाठी लवकरच तालुका जिल्हा राज्य पातळीवर महिला याच्याशी संवाद साधत सर्व घटकांना सामावून घेत भाजपा पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दोडामार्ग तालुक्यातील भाजपा महिला पदाधिकारी यांची नुकतीच भेट घेऊन नगरसेविका संध्या प्रसादी यांच्या निवासस्थानी महिला पदाधिकारी याच्याशी संवाद साधला.
यावेळी दिक्षा महालकर, महिला तालुकाध्यक्ष संध्या प्रसादी, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा कसई दोडामार्ग नगरपंचायत नगरसेविका दीपिका मयेकर, जिल्हा महिला उपाध्यक्षा तथा पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना बुडकुले, जिल्हा चिटणीस तथा परमे विकास सोसायटी व्हॉईस चेअरमन हसीना शेख, अल्पसंख्याक महिला तालुकाध्यक्षा सफुरा शेख उपाध्यक्षा, नेहा ठाकुर तालुका उपाध्यक्ष, आंकाक्षा शेटकर तालुका कार्यकारिणी सदस्य अंजली बुगडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.