सख्ख्या भावालाच सुरीने भोकसलं

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2024 12:23 PM
views 435  views

राजापूर : दोन सख्ख्या भावांच्या वादात एकानं दुसऱ्याच्या पोटात सुरीने भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची भयानक घटना राजापूर तालुक्यातील काजीर्डा राणेवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी काजीर्डा राणेवाडी येथील बाळकृष्ण आत्माराम राणे (७२) आणि त्यांचा सख्खा भाऊ शांताराम आत्माराम राणे (५६) यांच्यात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की बाळकृष्ण राणे यांनी त्यांच्या रागाच्या भरात आपल्या सख्ख्या भावाला सुरीने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामचंद्र चंद्रकांत अर्डे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळकृष्ण राणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 109 प्रमाणे राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.