विशाल परब यांच्या माध्यमातून शाळेत खाऊ वाटप

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: September 21, 2024 12:20 PM
views 208  views

सावंतवाडी : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील शाळा नंबर २, ४, ६ तसेच वि. स. खांडेकर या चार शाळांमध्ये मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.


केक कापून रविंद्र चव्हाण यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, धिरेंद्र म्हापसेकर, मंदार पिळणकर, सावंतवाडी युवामोर्चा अध्यक्ष संदेश टेंबकर, महिला सावंतवाडी उपाध्यक्षा सुकन्या टोपले, बुथ अध्यक्ष नागेश जगताप, अमित गवंडळकर, नाना भराडी, ज्ञानेश पाटकर, विजू साटेलकर, सुदेश नेवगी, रवी नाईक, गणेश कुडव, सॕबेस्तीन फर्नांडीस, महेश बांदेकर, रेखा लाखे आदी उपस्थित होते.