
सावंतवाडी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, संजय पांगम, उपसंघटक संजय गावडे, एकनाथ हळदणकर, शिवसेना पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या विविध योजनांच्या बाबतीत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शंकर नाईक, माजी सरपंच सौ. साक्षी नाईक, उपसरपंच प्रसाद नाईक व महिला लाभार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.