
देवगड : देवगड- जामसंडे नगरपंचायत सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात परस्पर आरोप प्रत्यारोपाने खरतर सर्वअर्थाने वदळी ठरली. शहरात कचऱ्याचा प्रश्न, मोकाट गुरे, भटकी कुत्रे, डासांचा प्रादुर्भाव,मच्छीमार महिलांचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्यांनी शहर ग्रासले असताना मुख्य अधिकारी स्वतः कधीही ग्राउंड लेव्हलला जाताना दिसत नसून शहरातील 17 प्रभाग माहित आहे का ? असावा नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी सभागृहात उपस्थित करत मुख्याधिकारी स्वतःकडे बॉल घेतात मात्र त्यांचा गेम काय दाखवत नाही असा सवाल उपस्थित केला.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आराखड्यात समाविष्ट करण्यात कामे आराखड्यात समाविष्ट करणे बाबत विचार विनिमय करत असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात परस्पर आरोप प्रत्यारोप होवून जोरदार खडाजंगी झाली अखेर सर्व नगरसेवकांना विकास कामांमध्ये समान संधी देण्यात यावे अशी आग्रही मागणी सर्व नगरसेवक सदस्यांनी सभेत केली.आणि या खडाजंगी वर पडदा पडला.
१६ऑगस्ट २०२४ रोजीच्या जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्रान्वये जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्यास कळविले होते आणि त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होत असताना या प्रस्तावात घेण्यात आलेली कामांमध्ये विकास कामांमध्ये १७ प्रभागातील प्रभाग क्रमांक २/४/१२ या प्रभागातील विकास कामांचा समावेश करण्यात न आल्याने या प्रभागातील नगरसेवकांच्या विकास कामा बाबत अन्याय करण्यात येत आहे.. त्यामुळे या प्रभागाचा विकास होऊ शकत नाही नगरोथान चां हा निधी सर्व प्रभागांना समप्रमाणात वाटप करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी करून या तीन प्रभागांना यामधून डावल्यामुळे या भागाचा विकास होऊ शकत नाही. वारंवार ठराविक प्रभागातच विकास कामे ही घेतली जातात असा आरोपी यात प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे असे सांगून प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यात विकास कामाला विरोध नाही परंतु ही कामे सर्व प्रभागात देणे गरजेचे आहे असे सूचित करण्यात आले त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आराखड्यात विकास कामे समाविष्ट करण्याबाबत विचार होत असताना ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या जिल्हा सहआयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामे आराखड्यात समाविष्ट करणे बाबत कळविण्यात असून याबाबत १७ प्रभागापैकी ८ प्रभागातील कामे ही आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली. त्यामुळे अन्य प्रभागातील नगरसेवकांवर अन्याय होत असल्याची तक्रार नगरसेविका प्रणाली माने, आणि तन्वी चांदोस्कर यांनी सभागृहात मांडली या विकास कामांमध्ये अन्य प्रभागातील विकास कामे समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी सभागृहात केली यावर सत्ताधारी यांनी विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत असताना यापूर्वी विकास कामे ही देवगड नगरपंचायतीत होत असताना सम प्रमाणात न्याय देण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक बुवा तारी दिली परंतु नगराध्यक्षांनी स्वतःच्या प्रयत्नाने उर्वरित प्रभागात आवश्यक असणारी विकास कामे आराखड्यात समाविष्ट करण्याकरीता आणली यावर कोणावरही अन्याय करण्यात आला नसून ज्या प्रभागात विकास कामे झालेली नाहीत .उलट या आराखड्यातील विकास कामांमध्ये ६० लाख रू.विकास कामांचा निधी देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष यांनी समाविष्ट केला आहे. याबद्दल सहभागात नगराध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले. यात भाजप विरुद्ध शिवसेना अशी खडाजंगी होत असताना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामे आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी मतदान घ्या अशी आग्रही मागणी विरोधी गटाचे सदस्यांनी केली त्यावर सत्ताधारी गटाने विकास कामात आम्हाला राजकारण करायचे नाही पण जर या उर्वरित प्रभागातील विकास कामे रोखायची असेल अवश्य मतदान घ्या जनतेला विकास होईल की विकास कामात राजकारण केले जाते हे समजेल अशा प्रकारचा टोला सत्ताधारी गटाने दिला. अखेर दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप होवून सभागृह शांत झाले.या पुढील आराखड्यात उर्वरित विभागातील विकास कामांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केली. एकंदरीत या चर्चेत प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी सभागृहात नगरसेवक नगरसेविका यांनी व्यक्त केली.
सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष मिताली सावंत मुख्याधिकारी सुरज कांबळे अन्य अधिकारी कर्मचारी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
या चर्चेत नगरसेवक नितीन बांदेकर निवृत्ती उर्फ बुवा तारी,नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर ,आद्या गुमास्ते ,तेजस मामघाडी, शरद ठुकरूल यांनी सहभाग घेतला होता.इतिवृत्तचे वाचन होत असताना देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दित कचऱ्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात गंभीर झाला असून स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत प्रसंगी स्वच्छता केली जात नाही. काही प्रभागात दोन तीन दिवस घंटागाडी जात नाही त्याचप्रमाणे नेहमी स्वच्छता केली जात नाही. याचा आढावा घेण्यात यावा व ज्यांच्या कामचुकारपणा केला त्यांच्या कारवाई करण्यात यावी अशी सूचना या सभागृहात करण्यात आली . साथीचे रोगाचा प्रादुर्भाव वाढता असून मागील एक वर्षात कोणत्याही प्रकारची जंतुनाशक फवारणी फोगिग मशीन द्वारे झाली नसून नाममात्र फवारणी झाल्याचे दाखविण्यात आले आहे याबाबत सर्व नगरसेवकयांनी नाराजी व्यक्त करून संबंधित मकतेदारांचे बिल अदा करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे कोणकोणत्या प्रभागात जंतुनाशक फवारणी फॉगिंग करण्यात आले आहे व त्यासाठी कोणत्या पद्धतीची औषधे वापरण्यात आली त्याची माहिती सभागृहाला देण्यात यावी अशी सूचनाही सदस्यांमधून करण्यात आली या बैठकीत देवगड जामसंडे नगरपंचायत नोंदणी पथक विक्रेता समिती सदस्य निवडणुकीकरिता होणाऱ्या खरचास मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे घनकचरा डीपीआर अंतर्गत कॅपॅसिटी बिल्डिंग , इन्फॉर्मेशन एज्युकेशन या घटकांतर्गत उपलब्ध निधीमधून अनुवंशिक कामे करण्यात विचार विनिमय करून मंजुरी देण्यात आली तसेच आवश्यक त्या ठिकाणी गॅस कटर मार्फत पुन्हा गवत कापणी व परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी सूचनाही सदस्यांकडून करण्यात आली.
देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासकीय कामकाजासाठी वाहन खरेदी करणे बाबत सर्वांनामुते मंजुरी देण्यात आले या सर्वसाधारण सभेत डीजे एमपी या ग्रुपवर नगरसेवकांनी केलेल्या सूचनांची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही असे होत असेल तर हा ग्रुप बंद करण्यात यावा त्याचप्रमाणे प्रशासनाकडे नगरसेवकांमार्फत दिलेल्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही त्याचा बाबतचा अहवाल सभागृहात अथवा संबंधित नगरसेवकांना प्राप्त होत नसल्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाच्या बाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले .
गेली कित्य ेक वर्षे देवगड मध्ये देवगड जाण्यासाठी हद्दीत मोकाट गुरां चा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना त्यावर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. अथवा कोंडवाडा निर्मिती खुल्या क्षेत्रात करण्यात येत नसल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त करून मोकाट गुरां बाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी खुल्या क्षेत्रातील अतिक्रमण बाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात येऊन मत्स्यविकेचा महिलांना एकत्रित शहराच्या मध्यवर्ती भागात बसण्याकरता नगरपंचायतीतील खुल्या क्षेत्राचा विचार करण्यात येऊन त्यावर मच्छी मार्केटची निर्मिती करण्यात यावी व मासेविक्रेत्या महीलाची समस्या दूर करण्यात यावी अशी सूचना या सभागृहात करण्यात आली.