सावंतवाडी : येथील राजन गावडे रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या ५ फ्रेश रक्तपिशवींची आवश्यकता होती. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक या दात्यांनी सावंतवाडीतून गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले.
गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून दिले जात आहे. बांदा येथील एका रुग्णाला गोवा बांबोळी येथील रुग्णालयमध्ये हृदयाच्या ऑपरेशन दरम्यान ओ- पॉझिटिव्ह या दुर्मिक रक्त गटाच्या एकाचवेळी तब्बल ५ फ्रेश रक्त पिशव्यांची अत्यंत तातडीची आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक यांनी सावंतवाडी येथून गोवा - बांबोळी रुग्णालयमध्ये जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करता आली. यासाठी देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांनी तातडीनं रक्तदान केल्यान रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करता आली. यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांकडून व रूग्णालय प्रशासन याजकडून रक्तदाते व युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानण्यात आले.