डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 19, 2024 10:04 AM
views 84  views

सावंतवाडी : डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे 'फाउंडेशन कोर्स इन आर्ट' हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ष २०२३ पासून सुरु करण्यात आला आहे. ह्या कोर्सच्या पहिल्याच बॅचमधील अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापिठाच्या बीएफए या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त झाले. त्यापैकी २२ विद्यार्थ्यांचे बीएफए अप्लाईड आर्ट या अभ्यासक्रमासाठी बी.एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी येथे प्रवेश मिळाला आहे. 

एका विद्यार्थीनीला मुंबईतील नामांकीत शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद बांदेकर, सचिव सौ. अनुराधा बांदेकर परब, बी.एस. बांदेकर कलामहाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष रमेश भाट यांनी अभिनंदन केले आहे.