
वेंगुर्ला : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत महात्मा गांधी जयंतीचे ऑचित्य साधुन दिनांक ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता हि सेवा मोहिम १७ सप्टेंबर २०२४ ते दिनांक २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत स्वच्छता शपथ, स्वच्छता दौड, सायक्लोथॉन, स्वच्छता प्रश्नमंजुषा, टाकाउुपासुन टिकाउु वस्तु तयार करणे, कचरा वर्गीकरण, पेंटींक स्पर्धा, पोस्टर स्पर्धा स्वच्छतेबाबत वेशभुषा, स्वच्छतेबाबत गीत व गायन, सफाईमित्र सुरक्षा शिबीर, श्रमदान, सागर किनारा स्वच्छता, एकल प्लॅस्टीक न वापरण्याबाबत जनजागृती, शुन्य कचरा उपक्रम, एक झाड आईच्या नावे उपक्रम, स्वच्छता जोत, मानवी साखळी आयोजित करणे, ग्रामपंचात स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, वैयक्तीक शोष खडडा व कंपोस्ट खडडा निर्मीर्ती, स्वच्छता सेल्फी पॉईंट, स्वच्छता वाहने व उपकरणे यांचे सुशोभिकरण असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी दिली.
या वर्षी स्वच्छता हि सेवा कार्यक्रमांतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” हि थीम निश्चीत केली आहे. त्या निमित्ताने पंचायत समिती वेंगुर्ला येथे आज बुधवारी (१८ सप्टेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी स्वच्छता हि सेवा मोहिमेबाबत प्रस्तावना केली. कृषी अधिकारी शुभदा कविटकर, यानी स्वच्छता हि सेवा मोहिम १७ ते २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. गाव पातळीवर घ्यावयाचे उपक्रम सखोल स्वरुपात नियोजन करुन दिले. विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी यानी सदर कार्यक्रम राबविणेबाबत माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र लिलके यानी स्वच्छता व आरोग्य याबाबत माहिती दिली. गटशिक्षणाधीकारी पंचायत समिती वेंगुर्ला यानी शालेय स्तरावर घ्यावयाच्या उपक्रमा बाबत माहिती दिली. उपअभियंता ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग वेंगुर्ला प्रफुल्लकुमार शिंदे यानी सार्वजनिक स्तर व वैयक्तिक स्तर शोषखडा, कंपोस्ट खडडा, बाबत माहिती दिली.
या कार्यशाळेस तालुका स्तरावरील अधिकारी,कर्मचारी, सरपंच,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक उपस्थित होती. कार्यक्रमात स्वच्छता शपथ घेणेत आली. तसेच परीसर स्वच्छता करणेत आली. गाव पातळीवरील प्रत्येक घटकाने स्वच्छता हि सेवा कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी यानी केले.