
दोडामार्ग : स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत कसई दोडामार्ग नगरपंचायत व लक्ष्मी सीताराम हळबे कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 17 सप्टेंबर रोजी मच्छिमार्केट येथे वृक्षारोपण करण्यात आले.
स्वछता ही सेवा अशी शपथ घेऊन अभियानाला सुरवात केली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या हस्ते नारळाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नगरपंचायत कर्मचारी व हळबे कॉलेज चे विद्यार्थी यांनी मच्छी मार्केट च्या सभोवताली सुपारी, नारळ, शोभेची झाडे लावून रुक्षारोपण केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले. स्वछता ही सेवा या नगरपंचायतच्या अभियानात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी गायकवाड यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम खडपकर यांनी केले. यावेळी नगरपंचायत कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.