
सिंधुदुर्गनगरी : ओरोस बुद्रुक सुतारवाडी येथील जयसिंग उर्फ महेश रामचंद्र मेस्त्री (५१) यांचे मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी राहत्या घरात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
सुतारवाडी येथील महेश मेस्त्री हे नेहमीप्रमाणे गणेश पूजा करून घरात बसले होते. मात्र मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्यास सुतारवाडी सह ओरोस गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे