सासोली गावचा एकोपा

Edited by: लवू परब
Published on: September 10, 2024 12:52 PM
views 281  views

दोडामार्ग : वडिलोपार्जित परंपरा जोपासली जाते तो सासोली गाव. आजच्या कलियुगातही एक मंडळ भजन आरती एकत्र करत आपली वडिलोपार्जित परंपरा जोपासत आहे.

  आजच्या या युगात एकत्र भजन करणे, एकीचे बळ दाखवणे फार कठीण झाले आहे. मात्र दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकत्र राहून सर्व धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम एकत्र कुटुंबाप्रमाणे करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. या गावचे गावकरी तसेच इतर सर्व मंडळी गावात एकोप्याने राहून प्रत्येक कार्य करीत असतात. आणि विशेष म्हणजे पाच दिवसांचे गणपती बाप्पा विसर्जन करताना या गावचे गावकरी दाजी गवस यांचा मानाचा बाप्पा विसर्जनावेळी बाहेर काढल्याशिवाय इतर कोणीही गावातील मंडळी आपला गणपती बाप्पा बाहेर काढणार नाही. गावकरी गवस त्यांच्या घरातील मानाचा बाप्पा विसर्जना वेळी बाहेर काढल्या नंतर इतर गावातील मंडळी आपला गणपती बाप्पा विसर्जनाला बाहेर काढणार ही मोठी परंपरा या गावची आहे. अशा अनेक परंपरा हा गाव जोपासत आपल नावलौकिक करत आहे. त्यामुळे इतरही गावांनी याची प्रेरणा घ्यायला हरकत नाही.