
रत्नागिरी : लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी रत्ननगरी सज्ज झाली आहे. गुरुवारी शहरात सकाळी व दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या पण भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. भर पावसातही त्यांनी दुकानात गर्दी केली.
बाप्पासाठी लागणार्या फुले, मोत्यांच्या माळा, विविध फुलांचे हार, दागिने, सजावटीसाठी मखरे, रांगोळी, विद्युत रोषणाईसाठी तोरणे, कापूर, धूप, अगरबत्ती आणि पेढे व सर्व प्रकारच्या मेवामिठाईने बाजारपेठ सजली.
लाडक्या बाप्पाचे येत्या शनिवारी ७ सप्टेंबरला होणार आहे. यावर्षी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला घरगुती १ लाख ६६ हजार ८६७ तर १२२ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सन २०२३ पेक्षा यावर्षी घरगुती गणपर्तीमध्ये ११९ ने घट झाली आहे. सार्वजनिक गणपतींमध्ये सहाने वाढ झाली आहे.