कारिवडेच्या म. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रशांत राणे

Edited by: विनायक गांवस
Published on: September 04, 2024 15:30 PM
views 180  views

सावंतवाडी : महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती कारिवडेच्या अध्यक्षपदी प्रशांत शिवराम राणे यांची ग्रामपंचायत कारिवडे येथे झालेल्या‌ ग्रामसभेमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी कारिवडे गावचे सरपंच आरती अशोक माळकर तसेच उपसरपंच तुकाराम आमुणेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश गांवकर, ग्रा.प.सदस्या भाग्यश्री भारमल, ग्रा.प.सदस्या तन्वी साईल, ग्रा.प.सदस्या अरुणा सावंत  ,ग्रा.प.सदस्या साक्षी परब, अशोक माळकर, भाजपा आंबोली मंडळाचे, उपाध्यक्ष तानाजी साईल, माजी सरपंच, पोलिस पाटील प्रदिप केळुसकर, लक्ष्मण भालेकर, अमर धोंड, ग्रामविकास अधिकारी भरत बुंदे, तसेच  ग्रामस्थ कर्मचारी वृंद उपस्थित होते.