
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. उच्च माध्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मर्या, पतपेढी, सिंधुदुर्गनगरीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकताच एस्. एम्. हायस्कूल, कणकवलीचे ज्येष्ठ सेवक साबाजी शांताराम मेस्त्री यांचा सेवेची ३८ वर्षे प्रदिर्घ सेवा उत्तमरित्या केल्याबद्दल पतेढी अध्यक्ष संजय वेतुरेकर, निलेश पारकर (जिल्हा संघटक, शिक्षकेतर संघटना, सिंधुदुर्ग). मारुती पुजारी (संचालक) संदीप कदम (संचालक) विद्या शिरसाट (संचालिका) व इतर संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर साबाजी मेस्त्री यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. उच्च माध्य, व अध्यापक विद्यालय, संघटना जिल्हाध्यक्ष अनिल राणे,. गजानन नानचे (विभागीय कार्यवाह तथा जिल्हा सचिव, सिंधुदुर्ग) वैभव केंकरे (तालुकाध्यक्ष सावंतवाडी) रामा गवस (जिल्हा प्रतिनिधी) श्री. कैलास घाडीगावकर (अंतर्गत हिशोब तपासणीस) व जिल्हयाभरातील शिक्षकेतर बांधवांनी सेवानिवृत्तीनिमित्ताने निरोगीमय दिर्घायुष्याबददल शुभेच्छा दिल्या आहेत.