खुली गवळण गायन स्पर्धा

Edited by: लवू परब
Published on: September 03, 2024 10:54 AM
views 127  views

दोडामार्ग : सार्वजनिक गणेश मंडळ आयी यांच्यातर्फे गणेश चतुर्थी निमित्त खुली गवळण गायन स्पर्धा शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

     या स्पर्धेला प्रथम पारितोषिक ४ हजार रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३ हजार रु. व चषक, तृतीय पारितोषिक २ हजार रु. व चषक तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तरी या स्पर्धेत अनेकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.