दोडामार्ग सावंतवाडा शाळेच्या पालकांचं आंदोलन स्थगित !

Edited by: लवू परब
Published on: August 29, 2024 13:29 PM
views 138  views

दोडामार्ग : दोडामार्ग सावंतवाडा येथील प्राथमिक शाळेत शिक्षक द्या या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या आंदोलनाला आज गटशिक्षण अधिकारी नदाफ यांनी भेट दिली. उद्या शुक्रवारी एक शिक्षक देऊ असे आश्वासन दिले, त्या नंतर शाळा व्यवस्थापन समितीने आपले आंदोलन स्थगित केलं.

दोडामार्ग सावंतवाडा येथील प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने अजून एक शिक्षक द्या या मागणी साठी शिक्षण विभाग व गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे मागणी केली. वारंवर सांगून देखील याकडे दुर्लक्ष केला असल्याने अखेर पालकांनी व समितीने आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला व काल बुधवारी सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. दिवसभरात त्यांच्या आंदोलनाला कोणीही भेट दिली नाही. जोपर्यंत आम्हाला कायम स्वरूपी शिक्षक मिळात नाही तोपर्यंत आम्ही आंदोन सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

आज गुरुवारी सकाळी पुन्हा आंदोलन सूरू झाले. यावेळी गटशिक्षण अधिकारी नदाफ यांनी आज आंदोलनाला भेट दिली व चर्चा केली व उद्या पासून याठीकाणी शिक्षक देऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर सुरु असलेले आंदोलन आज दुपारी स्थगित करण्यात आले. यावेळी त्यांचा सोबत उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, संतोष हडीकर, पालक आदी उपस्थित होते.

स्वयंम सेवक भरती झाल्यावर शिक्षक देऊ : गटशिक्षण अधिकारी नदाफ

दोडामार्ग सावंतवाडा या प्राथमिक शाळेत 2 शिक्षक कार्यरत आहेत. एक शिक्षिका प्रसुती रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जागी दुसरे शिक्षक सध्या देण्यात आले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी स्वयंम सेवक भरती होणार त्यावेळी आपण त्या ठिकाणी प्राधान्याने शिक्षक देऊ. मात्र तोपर्यंत कुठे दुसरे शिक्षक उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी शिक्षक देण्याची कार्यवाही करू. मात्र पट संख्या पाहिली तर त्या शाळेत दोनच शिक्षक मंजूर आहेत. त्यामुळे 3 रा शिक्षक आपण कायम स्वरूपी देऊ शकत नाही. मात्र जिल्हा स्तरावरून स्वयमसेवक भरती झाल्यावर आम्ही शिक्षक देऊ शकतो आणी भरती झाल्यावर जो पर्यंत कार्यरत असेल तो पर्यंत आम्ही त्या ठिकाणी स्वयंसेवक शिक्षक देऊ. सध्या दुसऱ्या शाळेतून जरी शिक्षक काढून या शाळेत दिला तरी तिकडे पुन्हा अडचण निर्माण होते. त्यावेळी त्या गावातील पालक पुन्हा आंदोलन करीत आमच्या पर्यंत येतात तरी आपण प्रयन्त करू असे गटशिक्षण अधिकारी नदाफ यांनी बोलताना स्पष्ट केले.

मुलांच शैक्षणिक नुकसान थांबवा : बाबुराव धुरी 

 दरम्यान शिक्षकाच्या मागणी साठी सुरु असलेल्याआंदोलनाला उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की इथले आमदार जे आहेत ते शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याच मतदार संघात शिक्षणाची ही अवस्ता आहे मुलांना शाळा सोडून बाहेर बसावे लागत आहे ही शोकांतिका आहे. आपल्या मतदार सांगातील तरी शिक्षक वर्ग तात्काळ भरा आणि मुलांच शैक्षणिक नुकसान थांबवा असे यावेळी धूरी म्हणाले.

आमदार किंवा मंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा एकत्र येऊन समस्या सोडवा :  नानचे

यावेळी आंदोलनाला उपस्थित असलेले नगरसेवक संतोष नानचे म्हणाले की आमदार किंवा मंत्री यांच्यावर टीका करण्यात पेक्षा सर्व एकत्र येऊन इथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. सर्व पालक वर्ग येऊन आंदोलन करीत आहेत त्याच्यातून चांगला मार्ग निघाला आहे. लवकरच या शाळेसाठी शिक्षक मिळणार आहे  त्यामुळे ही शाळा कशा प्रकारे चांगली चालेल याच्यासाठी आम्ही व्यक्तिश: प्रयत्न करू. 

राजकारण नको : गणेशप्रसाद गवस

सदर शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून पहिली ते चौथी पर्यंत दोन शिक्षक व पुढे पाचवीत एक मुल असेल तरी आणखीन एक शिक्षक दिला जातो. आज जवळपास तालुका आणि जिल्ह्यात अनेक रिक्त शाळामध्ये शिक्षक भरतीत शिक्षक दिलेले आहेत. या शाळेतही नियमानुसार दोन शिक्षक दिलेत व येथील विध्यार्थी संख्या पहाता अजून एक शिक्षक स्वयंसेवक डिएड भरतीवेळी प्राधान्याने दिला जाईल. तेथील पालकांकडून झालेल्या मागणीनुसार श्री. निंबाळकर गुरुजी ज्याची नियमानुसार बदली झाली त्यानाही परत सदर शाळेवर कामगिरीवर पाठवून शाळा व्यवस्थापन केलं आहे. आमचे नेते व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही सोय करण्यात आली. अन्य शाळाच्या तुलनेत या १ ते ४ च्या शाळेत मुलांची संख्या ५० हुन अधिक आहे. त्यामुळे तीसरा शिक्षकही स्वयंसेवक दिला जाईल, त्यामुळे पालकांनीच प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे.