
वेंगुर्ला : धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, अणसुर सामाजिक कार्यकर्ते चंदू गावडे, दया खर्डे आदी उपस्थित होते.