
देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड घाडीवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश वासुदेव गांवकर (७५) यांचे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने उपचारादरम्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई, पुतण्या असा परिवार आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हनुमंत गांवकर यांचे ते बंधू होत.