बेलिफ गट-क संघटनेच्या अध्यक्षपदी विलास सावंत यांची पुन्हा नियुक्ती

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 21, 2024 13:37 PM
views 158  views

सिंधुदुर्गनगरी  : सिंधुदुर्गन्यायालयीन बेलिफ कर्मचारी गट क संघटनेची सन २०२३-२०२४ ची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गनगरी येथील संकुलातील बेलिफ संघनेच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये प्रथम बेलिफ कर्मचारी याचे १०वी/१२वी पदवी परिक्षा मध्ये ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सन- २०१९ ते २०२४ पर्यतच्या गुणवंत मुलांच्या सत्कार संघटनेचे अध्यक्ष विलास.स. सावंत व सिंधुदुर्ग जिल्हयातील उपस्थीत बेलिफ व प्रमुख बेलिफ यांच्या हस्ते संप्न्न झाला.तर याच सभेत नूतन अध्यक्ष म्हणून पुन्हा विलास सावंत यांचीच एक मताने निवड करण्यात आली.


यावेळी ओरोस येथील प्रमुख बेलिफ ए.डी.गुरव, कणकवली प्रमुख बेलिफ एस.जे. नेवगी, सावंतवाडी प्रमुख बेलिफ एम.एम.जाधव यांच्या हस्ते मयुरी सुधाकर मांजरेकर, तन्वी विलास सावंत, अनन्या संदिप जिकामडे,. श्रृती मंगेश गावडे, धनश्री दिनेश गावडे, ओंकार दशरथ गावडे व सोहम सुधाकर मांजरेकर या गुणवंत मुलांचे सत्कार करण्यात आले.

 या सभेसाठी व सत्कार कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेलिफ कर्मचारी बहुसंख्येने उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे व सभेचे सुत्रसंचलन संघटनेचे सचीव  प्रकाश पवार यांनी केले.

  या सभेत  सन २०२४-२०२५ या वर्षाकरीता संघटनेच्या नवीन कार्यकालीनी मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून व्ही.एस.सावंत, उपाध्यक्ष म्हणून डी.आर गावडे तर प्रमुख कार्यवाह पी.बी.पवार, कार्यवाह एस.जे.जिकामडे, कोषाध्यक्ष ए.डी. गुरव, प्रतिनिधी म्हणून ओरोस एस.एस. मांजरेकर, एस.के.परब,देवगड, पी.टी. जाधव, कणकवली पी.डी.खाचरे, मालवण सी.आर. दुखंडे, मालवण एच.पी.आकेरकर, आर.बी.सावंत वेंगुर्ले जी.एन. जाधव, देवगड पी.टी. जाधव,दोडामार्ग एस.एम.कदम, सल्लागार एस.एम. ठाकुर उपस्थित होते.