ह.भ.प. चारूदत्त‌ आफळे बुवांच्या कीर्तनात भक्तगण तल्लीन !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2024 06:18 AM
views 95  views

सावंतवाडी : प.पू.भाऊ मसुरकर जन्मशताब्दी सोहळा विठ्ठल- रखुमाई मंदीरात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्त‌ आफळे बुवांच्या कीर्तनात भक्तगण तल्लीन झाले. संत रांका कुंभार यांच्यावर आफळे बुवांनी कीर्तन सेवा केली. यावेळी त्यांनी संत महात्म सांगताना संतांचा संग धरा असा उपदेश दिला.

प.पू.भाऊ मसुरकर जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापुजेच आयोजन करण्यात आलं होतं. विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांच आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी  येथील विठ्ठल मंदिरास भेट देत विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले. महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना त्यांनी विठूरायाकडे केली. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.