
वेंगुर्ले : व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत सापडलेले भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्यांची कृती महिलांचा अपमान करणारी असून अशा वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी व्यक्त केली.
शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी नगरसेविका सुमन निकम, उभादंडा उपसरपंच टीना आल्मेडा विभागप्रमुख संदीप पेडणेकर, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, उपविभाग प्रमुख कांता घाटे, सुहास मेस्त्री, गजानन गोलतकर, श्रीधर पंडित, हेमंत मलबारी, सुरेश वराडकर, संदीप केळजी, किरण सावंत, सचिन मांजरेकर, शाख संघटिका सीमा गावडे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा महिला विभाग प्रमुख रश्मी डीचोलकर, अपेक्षा बागायतकर, सुशीला नांदोस्कर आदी उपस्थित होते.