सिंधुदुर्गच्या राजाचं उद्या होणार आगमन...!

Edited by:
Published on: September 16, 2023 13:38 PM
views 206  views

कुडाळ : भाजप कार्यालय येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाचे आगमन उद्या रविवारी १७ सप्टेंबर रोजी सायं. ४ वा. भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगून सिंधुदुर्ग राजा गणेश उत्सवामध्ये दर दिवशी सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य विषयक सामाजिक कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले या गणेशोत्सवाच्या नियोजनाची बैठक नुकतीच भाजप कार्यालय येथे संपन्न झाली.

सिंधुदुर्ग राजा गणेश उत्सवाची नियोजनाची सभा भाजप कार्यालय येथे झाली यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, प्रदेश सदस्य सौ संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, पप्प्या तवटे, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, माजी बांव सरपंच नागेश परब, साईनाथ म्हाडदळकर, राजेश पडते, चंदन कांबळी, राजवीर पाटील, अनुप जाधव, तन्मय वालावलकर आदी उपस्थित होते.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत होणार सेवा सप्ताह साजरा

भाजपच्या वतीने सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे या निमित्ताने उद्या रविवार १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे सायं. ५.३० वा. होणार आहे यावेळी भाजप नेते निलेश राणे उपस्थित राहणार आहेत तसेच २२ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा.  देवेंद्र प्रबोध माला पुष्पदोन होणार असून हे ह. भ. प. हरिहर नातू कीर्तनाच्या माध्यमातून सादर करणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावी करण्यात आले.

गणेश उत्सव साजरा होणार विविध कार्यक्रमांनी

सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना मंगळवार १९ सप्टेंबर रोजी होणार आहे दरम्यान गणरायाच्या मूर्तीचे आगमन रविवार १७ सप्टेंबर रोजी बजाज शोरूम ते भाजप कार्यालयापर्यंत सायंकाळी चार वाजता होणार आहे या गणेशोत्सवामध्ये सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडपामध्ये विविध सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.