
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील ७६ वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे आ. नीतेश राणे यांनी दर्शन घेतले असून.यावेळी आमदार नितेश राणे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत शिरगांव बाजारपेठ येथे स्वागत करण्यात आले.कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील ७६ वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे शुक्रवारी दर्शन घेतले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम देवगड मंडल अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम, माजी जिल्हापरिषद सदस्य सुभाष नार्वेकर, ओंबळ सरपंच अरुण पवार, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तारक चव्हाण, शरद साटम, बंटी जेठे, संतोष तावडे, सुधीर साटम, ओमकार तावडे,बंडू माने आदी कार्यकर्ते व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने अध्यक्ष राजाराम साटम यांनी त्यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.