
बांदा : जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील विद्यार्थिनी किमया संतोष परब हिची सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणून नवोदयाची परीक्षा ३० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्यामार्फत राबवल्या जात असलेल्या या विद्यालयात सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते.
बांदा केंद्र शाळेची विद्यार्थिनी किमया परब हिची या निवड झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर व सदस्य, पालक, केंद्रप्रमुख संदीप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.
किमयाने यापूर्वी गणित प्रज्ञा परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले आहे. तसेच विविध संघटनामार्फत आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सुयश प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. यावर्षी नवोदयाच्या पहिल्या यादीत शाळेची विद्यार्थिनी कनिष्का केणी व नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत किमया परब हिची निवड झाल्याबद्दल एका वर्षात दोन विद्यार्थीनींची निवड झाल्याबद्दल शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षक जे. डी पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, प्रशांत पवार, गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लागले. मिळवलेल्या यशाबद्दल केंद्रप्रमुख संदीप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले.